Tuesday, June 3, 2008

Paaus Daatlelaa !!

खुप दिवस झाले एखादा blog लिहिन म्हंतोय पण साला वेळच मिलत नाही...... मग स्वतालाच विचारले की खरच तुला स्वतासाठी एवढा पण वेळ नाही मिलत का ?? आणि उत्तर खाली आहे :-)

क्वचिताच कोणी असेल की ज्याला पाउस आवडत नाही !! पावसाने दरवल्नारा मृदगंध लहानान्पासुन थोरान्पर्यंत सर्वांना उल्हासित करून सोडतो.....नाही का ? उन्हाल्यातल्या गर्मिने त्रासलेला प्रत्येक व्यक्ति पावसाच्या आगमनाने हर्षित झालेला असतो..... मी पण अगदी तसाच common man सारखा पावसा साठी आतुरलेला एक जीव !! आज आकाशात ढग थोडेशे दाटून आलेले आहेत...... वाटत आहे की पाउस पडेल...... मोसमातला पहिला पाउस !!

Engineering second year first semester ची सुरुवात, स्थल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील front gate पार्किंग...... मी, मकरंद, चैतन्य, अनिकेत, आशीष आणि बरेच इतर phoenix members नेहमी प्रमाणे तर्र्या मारत बसलो होतो आणि अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली..... आणि पाहता पाहता आम्ही सगले पावसाचा आस्वाद लूटत मनसोक्त भिजू लागलो...... parking मधल्या कमानी वर अगदी वेडे वाकडे लटकू लागलो..... खुप मजा घेतली पावसात भिजायची !!

मग अनिकेत च्या कार मधे फिरायचा बेत ठरला..... मी, मकरंद, चैतन्य आणि अनिकेत पायीच निघालो अनिकेत च्या घरी जायला..... जाता जाता रस्त्यात उस्मानपुरा चौकात एक tractor चालला होता श्रेयनगर कड़े..... आम्ही सगले बसलो त्या tractor वर आणि उर्वरित प्रवास मस्त मजा लूटत झाला !! अनिकेत च्या घरून कार काढली आणि आनंदयात्री निघाले...... मनमन्दिर travels च्या समोर एक छोट्या टपरी वर जाउन थाम्बलो..... गरमा गरम भजी खाल्ली...... एक कटिंग चहा आणि सोबतीला एक सुट्टा !!

पुन्हा अस केव्हा घड़नार ??

Listening to Jagjit Singh.....Wo Kagaz ki Kashti Wo Baarish ka Paani !!!